महाराष्ट्र लोकसेवा आयोग (MPSC) मार्फत 36 विविध पदांसाठी भरती जाहीर करण्यात आली आहे. यामध्ये सहाय्यक कक्ष अधिकारी, संयुक्त संचालक, उपसंचालक, प्राध्यापक आणि शास्त्रज्ञ या पदांचा समावेश आहे. पात्र उमेदवारांनी 26 जून 2025 पूर्वी ऑनलाइन अर्ज करावा.
या भरतीसाठी कोणत्याही शाखेतील पदवीधर, डिप्लोमा, MBBS, BDS, MS/MD, पदव्युत्तर पदवीधारक उमेदवार अर्ज करू शकतात.
एकूण 36 पदांपैकी, सहाय्यक कक्ष अधिकारी पदांसाठी 23 जागा आहेत.
शैक्षणिक पात्रता:
संबंधित पदानुसार कोणतीही पदवी, MBBS, पदव्युत्तर डिग्री, BDS/MDS आवश्यक आहे.
वयोमर्यादा:
किमान वय: 18 वर्षे
कमाल वय: 55 वर्षे
(शासकीय नियमानुसार सूट लागू)
निवड प्रक्रिया:
- लेखी परीक्षा
- मुलाखत
अर्ज शुल्क:
- सामान्य प्रवर्ग: ₹719/-
- अनाथ व EWS प्रवर्ग: ₹449/-
पगार:
- किमान वेतन: ₹44,900/- प्रति महिना
- कमाल वेतन: ₹2,18,000/- प्रति महिना
अर्ज कसा करावा:
- अधिकृत संकेतस्थळाला भेट द्या
- MPSC भरती 2025 ची अधिसूचना वाचा
- नवीन युजर असल्यास नोंदणी करा
- लॉगिन करून अर्ज भरा
- अर्ज शुल्क भरा (लागू असल्यास)
- आवश्यक कागदपत्रे अपलोड करा
- अर्ज सादर करा व प्रिंटआउट घ्या
महत्त्वाच्या तारखा:
- अर्ज सुरु होण्याची तारीख: 02 जून 2025
- अर्ज करण्याची अंतिम तारीख: 26 जून 2025
टीप: अधिक माहितीसाठी अधिकृत वेबसाइट किंवा अधिसूचना अवश्य वाचा.