स्टेट बँक ऑफ इंडिया (SBI) कडून Circle Based Officers (CBO) पदासाठी जाहीर करण्यात आलेल्या जाहिरातीत सुधारणा करण्यात आली आहे. आता नॉर्थ ईस्ट सर्कलसाठी इंग्रजी भाषेचाही समावेश स्थानिक भाषांमध्ये करण्यात आला आहे, परंतु यासाठी काही अटी आहेत.
सुधारित अट काय आहे?
नागालँड आणि अरुणाचल प्रदेशातील उमेदवारांनी जर १०वी किंवा १२वीत इंग्रजी विषयासह उत्तीर्ण झाले असल्याचा पुरावा (मार्कशीट/प्रमाणपत्र) सादर केला, तर त्यांना नॉर्थ ईस्ट सर्कल अंतर्गत CBO पदासाठी पात्र मानले जाईल.
नोंदणीसाठी नवीन तारखा
🔹 नोंदणी सुरु होण्याची तारीख: 21 जून 2025
🔹 अंतिम तारीख: 30 जून 2025
🔹 नोंदणी लिंक: https://bank.sbi/web/careers/current-openings
ज्यांनी आधीच अर्ज केला आहे त्यांना काय करायचं?
जे उमेदवार आधीच अर्ज भरून झाले आहेत, त्यांना पुन्हा नोंदणी करण्याची गरज नाही.
महत्वाच्या सूचना
✅ सुधारित अट फक्त नागालँड आणि अरुणाचल प्रदेशातील शाळांमधून इंग्रजी विषयासह उत्तीर्ण झालेल्या उमेदवारांकरिता लागू आहे.
✅ इतर सर्व अटी व शर्ती जाहिरात क्र. CRPD/CBO/2025-26/03 प्रमाणेच राहतील.
नोकरीची तयारी करत असलेल्या उमेदवारांनी या नव्या बदलाची नोंद घ्यावी आणि पात्र असल्यास वेळेत अर्ज करावा.